२००६ मध्ये दाखवली गेलेली अवघाची संसार ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या एका साध्या सरळ गावातल्या मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं.